Consultant Pedatric Hemato-Oncologist
About Dr. Tushar IdhateDr. Idhate Tushar is the first and the best Pediatric Hematologist and Oncologist in the Marathwada region.
डॉ . तुषार इधाटे हे मराठवाड्यातील पहिले लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग तज्ञ आहेत . त्यांनी ऑर्किड हिमॅटोलॉजी सेंटरच्या माध्यमातून औरंगाबाद मध्ये लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोगांच्या रुग्णांसाठी सेवा सुरु केली आहे .
डॉ . तुषार बालमुकुंद इधाटे यांनी एमबीबीसचे प्रशिक्षण पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमधुन पुर्ण केले . त्यानंतर मुंबई येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सायन हॉस्पिटलमधुन बालरोग विषयात एमडी पुर्ण केले. त्यांनी अपोलो हॉस्पिटल दिल्ली येथून बालरोग कर्करोगात फेलोशिप केली आहे. तसेच डॉ. इधाते तुषार यांनी प्रतिष्ठित TATA कर्करोग रुग्णालय, मुंबई येथे बालरोग ऑन्कोलॉजीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी एव्हिलीना लंडन चिल्ड्रन्स हॉस्पिटल , इग्लंड येथुन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण व कौशल्य प्राप्त केले . आपल्या याच ज्ञानाचा वापर करुन मराठवाड्यातील गरजु रुग्णांसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत.
डॉ . तुषार इधाटे हे एमजीएम रूग्णालयात लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग विभागाचे प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत . या दरम्यान रूग्णालयात हिमॅटोलॉजी विभागाच्या स्थापनेमध्ये व विकासामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली आहे. शहरातील इतर नामांकित रूग्णालयांतही ते एक सुप्रसिध्द रक्तविकार व कर्करोग तज्ञ म्हणुन ओळखले जातात.
Patients
%
Success rate
Services
Years
Get In Touch
Location: Seven Hills Flyover Rd, near Silver In Hotel, Motiwala Nagar, Venkatesh Nagar, Mondha, Aurangabad, Maharashtra 431009
Telephone: 075073 81740 / 8554021666
Email: ohcdridhate@gmail.com
Clinic Hours: M-S: 10 am - 4 pm